खायचं काम नाही हे - सॅम कॉर्नर
शिवाजी पार्कचा कट्टा, मस्त थंडी आणि Sam चा पास्ता...
आज ख़ूप दिवसांनी शिवाजी पार्क ला फिरायचा आणि ह्या अनोख्या ठिकाणी खायचा योग आला..
सावरकर ऑडिटोरीयमच्या अगदी समोर सुशांत आणि शलाका हे joint चालवतात..
पास्ता, बर्गर, Panini, पिज़्ज़ा ही ईथली खासियत..
चारही पदार्थ खाल्ले आणि सर्वच अप्रतिम..
त्यातही पेरी पेरी Panini तर अफ़लातून.. हे सर्व पदार्थ इथे खायची मज्जाच और आहे कारण मस्त गजबजलेला शिवाजी पार्क चा कट्टा तिथला कॅालेजची आठवण करून देणारा माहौल आणि हे मस्त गरमागरम पदार्थ पेश करणारं हे तरुण कपल आणि त्यांची टीम..
शिवाजी पार्क ला गेलात तर अजीबात चुकवू नका..
Comments
Post a Comment