आटे दाल का भाव - फील्ड सेल्स
वास्तविक fmcg मध्ये फ़ील्ड सेल्स करणाऱ्याला जो अनुभव मिळतो त्याला तोड नाही.
दुकानात entry मिळवणे
आपल्या ब्रांड चा माल व्यवस्थित प्लेस होईल हे पाहणे
इतर ब्रांड मार्केटिंग साठी काय शक्कल लढ़वत आहेत?
कोणत्या प्रकारच्या दुकानात कोणती products चालतात
रूट प्लानिंग कसे करतात
त्यासाठी कोणते सोफ्टवेअर वापरतात
Competitor कोण आहेत
ते काय करतात
स्कीम कशा लावल्या जातात
मार्जिन negotiate कशी करायची
दुकानांच्या categories
सेल्स प्लानिंग
अश्या हज़ारों गोष्टी तुम्ही रोज़ शिकत असता.. ४ वर्ष हे काम व्यवस्थित केल तर अगदी सहज तुम्ही किमान ४०-५० हज़ार पगारावर पोहोचता
पण, unfortunately अनेक तरुण ऑफिस जॉब ला प्राधान्य देतात आणि कित्येक वर्ष १२-१५ हज़ारांवर अड़कुन राहतात..
कोणत्याही कारणाने तुम्हाला MBA किंवा तत्सम शिक्षण घेता आल नसेल तर तुम्हीं field sales मध्ये कुठलाही विचार न करता उड़ी मारली पाहिजे..
मी जेंव्हा बिज़नेस सुरु केला तेव्हा पहिली दोन वर्षे मी स्वतः फ़ील्ड सेल्स करायचो आणि खरच त्यातून खूप काही शिकायला मिळाले
तुम्हालाहि जर भरपूर शिकायची आणि चांगले पैसे कामवायची ईच्छा असेल तर फ़ील्ड सेल्स हा त्याचा राजमार्ग आहे.
Comments
Post a Comment