डिस्ट्रिब्यूशन अर्थात वितरण
डिस्ट्रिब्यूशन हे अत्यंत उत्तम क्षेत्र आहे ह्यावर माझा ठाम विश्वास आहेच पण काल एका अत्यंत अनुभवी डिस्ट्रिब्युटरना भेटुन त्याची अनुभुती देखील घेतली..
हे साहेब नेसले, अमूल व चितले बंधु ह्यांचे वितरक आहेत.
तब्बल ४००० दुकानांमध्ये त्यांचा माल जातो, ९ रूट्स वर ४ गाड्या धावतात. महिन्याला अंदाज़े ४ करोड़ रुपयांची उलाढाल हया व्यवसायात ते करतात
दिवसाला किमान ४०० ओर्डर प्रॉसेस होतात..
अजुनही क़ाही प्रॉडक्ट्स वितरण करण्याचा त्यांचा प्लान आहे..
एका मराठी माणसाचा हया क्षेत्रात कष्टाने उभा केलेला अवाका बघून फ़ार अभिमान वाटला..
आपणही नवीन उद्योग सुरु करायच्या विचारात असाल तर डिस्ट्रिब्यूशन चा नक्की विचार करा..
Comments
Post a Comment