रिकाम्या करवंटीची गोष्ट
अक्रम भाई आमचे खोब्र्याचे पुरवठादार आहेत.. त्यांचा सर्व व्यापार हा फक्त B२B स्वरुपाचा आहे.
त्यांची गाडी जेंव्हा आमच्याकड़े यायची तेव्हा परतीच भाडं न मिळाल्याने बरेचदा दिवस फुकट जायचे.
गेल्या महिन्यात त्यांचा फोन आला, अभी प्रॅाब्लेम खतम.
मी विचारलं कसा काय तर म्हणाले मुंब्रा, भिवंडी वगैरे भागांत करवंट्या जमा करणारे काही लोक आहेत ते एका वेळी १० टन करवंटी द्यायला तयार आहेत. ४ रुपये किलो मी ही करवंटी घेणार आणी तब्बल ११ रुपये किलोने विकणार.
त्यांना विचारले ह्याचा उपयोग नक्की कुठे होतो? तर म्हणाले ह्याची राख बनवून ती उदबत्तीमध्ये बेस म्हणून वापरतात. ही राख ७० रुपये किलो ने सहज विकली जाते.
फिल्टरिंग सिस्टिम, activated कार्बन अश्या अनेक ठिकाणी ह्यांचा उपयोग होतो.
बी२बी ह्या प्रकारात अश्या अनंत संधी आहेत. ज्यांना नविन उद्योग सुरु करायचा आहे किंवा गुंतवणूक करायची आहे त्यांनी फक्त गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीत अडकून न राहता असेही पर्याय शोधायला हवेत..
Comments
Post a Comment