ऍग्रो ट्रेडिंगच्या अगणित संधी
अनेक लोक सध्या गुंतवणुकीच्या नवनवीन संधी शोधताना दिसतात. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड वगैरे. पण आत्ता येऊ घातलेल्या नवीन कृषी कायद्यांमुळे ऍग्रो ट्रेडिंग आणि warehousing च्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. ३-४ मित्र मिळून ५०-६० लाखांच्या कॅपिटल मध्ये सहज १५-२०% चा ROI ह्यातून शक्य आहे. आणि २ वर्ष हा बिझनेस नीट चालवून बॅलन्स शीट फाईल केलीत तर बँक सहज CC देते जेणेकरून ह्या बिझनेसची वाढ शक्य आहे.
पुन्हा ह्यात शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड च्या मानाने रिस्क अत्यंत कमी आहे आणि ऑप्शन्स भरपूर आहेत. गुजरात, कर्नाटक राज्यात अनेकांनी हि संधी घ्यायला सुरुवात केलेली असताना महाराष्ट्रात मात्र ह्याचा तितकासा प्रसार दिसत नाही.
वास्तविक IT, बँक, बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या ४ लोकांना एकत्र येऊन हे ५०-६० लाख उभे करण काही फार कठीण काम नाही पण कदाचित लोकांना हि संधी अजून लक्षात येत नाहीये.
बिझनेस २ बिझनेस वर्गात हे सर्व असल्यामुळे फार धावाधाव नाही आणि शिवाय अनेकांच्या नॉन प्रोडक्टिव्ह अससेट्स ह्यामुळे त्यांना productive बनवता येतील
Comments
Post a Comment