Posts

Showing posts from February, 2022

SALES

 सेल्स हे वास्तविक भारतातील सर्वात मोठी गॅप असलेलं फील्ड आहे असं मला वाटत.  मी स्वतः भारत, अमेरिका व दुबई इथे सेल्स केलेला आहे पण ज्या प्रकारचे लोक अमेरिकेत सेल्स किंवा क्लायंट एंगेजमेंट मध्ये दिसतात त्या तुलनेत भारतात वेगळेच चित्र आहे. एक सॉफ्टवेअरचे क्षेत्र सोडले तर सेल्स म्हणजे ज्याला दुसरं काहीही जमत नाही त्याने करायचं काम असं चित्र दिसतं.  मी स्वतः ५ वर्षांपूर्वी घाण्यावर काढलेली तेल विकण्याचा व्यवसाय सुरु केला. आमच्या कंपनीत सध्या ४० लोक काम करतात पण सेल्स ची वर्कफोर्स हा सर्वात मोठा चॅलेंज आहे.  वास्तविक सेल्स हे हाय ग्रोथ फील्ड आहे आणि तुमचा पगार अक्षरशः २-३ वर्षांत दुप्पट होऊ शकतो हे माहीत असूनही ह्या क्षेत्राच्या बाबतीत बहुतांश तरुण उदासीन का आहेत ते कळायला मार्ग नाही.  सध्या FMCG आणि रिटेल अत्यंत झपाट्याने कात टाकत आहे व त्यामुळे ह्या क्षेत्रातील सेल्स करणाऱ्या लोकांना प्रचंड मागणी येणार हे स्पष्ट आहे.  तरी मराठी मुलांनी ह्या क्षेत्राचा विचार करायला हवा असं मला वाटतं